Budget 2019:  करदात्यांसाठी खूषखबर, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 2019-2020 आर्थिक वर्षात पहा कोणाला, कसा भरावा लागणार Income Tax
Image used for illustration purpose | (Photo Credits: LatestLY)

Tax Slabs For 2019-2020:  पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेट 2019 मध्ये सामान्यांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. नोकरदार आणि सामान्य जनतेचं लक्ष यंदा सादर होणार्‍या कररचनेकडे लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारने 5 लाख रूपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त (full tax rebate) केलं आहे. त्यामुळे सहाजिकच ही नोकरदार व्यक्तींसाठी मोठी दिलासादायक गोष्ट ठरली आहे. Budget 2019 Live News Updates पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सध्याच्या कररचनेप्रमाणे केवळ 2.5 लाख रूपयांचं उत्पन्न हे करमुक्त होते. मात्र आता वैयक्तिक उत्पन्न 5 लाख रूपयांपर्यंत करमुकत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीड लाखाच्या गुंतवणूकीवर कोणताही कर नाही. 40 हजारापर्यंतच्या बँकेत ठेवलेल्या रकमेवर आता टीडीएस लागणार नाही अशी घोषणाही गोयल यांनी केली.  मध्यमवर्गाला 6.5 लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री राहणार आहे.

कशी असेल 2019- 20 या आर्थिक वर्षासाठी कर रचना ? 

Income Tax Slab For 2019 -2020 (File Photo)

सरकारच्या या घोषणेचा फायदा सुमारे 3 कोटी मध्यमववर्गीय करदात्यांसाठी मिळणार आहे. या करदात्यांना करसवलत मिळणार आहे.