पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारताकडून एअरस्ट्राईक करण्यात आल्यानंतर भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेले होते. दरम्यान बडगाम (Budgam) येथे 27 फेब्रुवारी दिवशी वायुसेनेकडून एम आय 17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये 6 एअरमॅनचा मृत्यू झाला होता. परंतू ही भारतीय वायुसेनेकडूनच झालेली चूक असल्याचं सांगितलं जात आहे. कोर्ट ऑफ इन्कॉयरी दरम्यान श्रीनगर येथील वायुसेनेच्या एअर ऑफिस कमांडिंगला ट्रान्सफर करण्यात आलं आहे.अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर: बडगाम येथे हेलिकॉप्टर कोसळून महाराष्ट्रातील पायलट निनाद मांडवगणे यांचा मृत्यू
एम आय 17 च्या दुर्घटनेची निपष्पपणे तपासणी व्हावी म्हणून वायुसेनेच्या अधिकार्यांना हटवण्यात आले आहे. 14 फेब्रुवारी दिवशी भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 26 फेब्रुवारी दिवशी भारतीय सेनेने बालाकोट परिसरामध्ये जैश ए मोहम्मद येथे दहशतवादी तळ उडवला. त्यानंतर 27 फेब्रुवारी दिवशी पाकिस्तानी वायुसेनाचं विमान भारतीय सीमेच्या पार आलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना एमआय 17 हेलिकॉप्टर बडगाम मध्ये दुर्घटनाग्रस्त झालं.
सध्या कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणी वायुसेनेच्या अनेक अधिकार्यांची चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप वायुसेनेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.