बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी शनिवारी प्रदेशाची राजधानी लखनौ येथील टी. एस. मिश्रा मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल मध्ये कोरोनावरील लसीचा डोस घेतला आहे. त्या दरम्यान मायावती यांनी असे म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारला मी पुन्हा अपील करते की गरीबांसाठी कोरोनाच्या लसीचे डोस मोफत देण्याची व्यवस्था करावी. त्याचसोबत जनतेला असे ही अपील केले की, कोविडच्या नियमांचे पालन करावे.(Covid-19 Cases in India: देशातील 'या' 6 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ अधिक; नियमांचे पालन करण्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आवाहन)
बहुजन समाज पार्टीच्या चीफ यांनी ट्वीट करत असे म्हटले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जनता मोठ्या संकटात सापडत आहे. यापासून बचाव करण्यासाठी कोरोना व्हायरसच्या लसीकरणाची जी मोहिम सुरु आहे त्या दरम्यानच मी सुद्धा टी एस मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारला पुन्हा एकदा अपील केले आहे की, त्यांनी गरीबांना मोफत लस द्यावी.(Covid-19 Vaccine: HDFC Bank आपल्या कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार)
Tweet:
Bahujan Samaj Party chief Mayawati receives COVID-19 vaccine jab at a private hospital in Lucknow.
"I appeal the Central and state government to provide free vaccine to the poor. I appeal to everyone to take the vaccine," she says. pic.twitter.com/woJHXQomfE
— ANI UP (@ANINewsUP) March 13, 2021
या व्यतिरिक्त त्यांनी आणखी एका ट्वीट मध्ये असे लिहिले आहे की, देशातील जनतेने त्यांनी कोरोनाच्या नियमांचे योग्य पद्धतीने पालन करावे. त्याचसोबत लसीकरणासह शासकीय औषधे घेण्यास नकार देऊ नये.