Drone in Fazilka District | Representational image (Photo Credits: ANI)

भारत-पाक सीमेवर दररोज ड्रोनच्या (Drones) हालचाली पहायला मिळत आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Force) जवानांना रात्री 12 वाजता फाजिल्का (Fazilka District) सीमेजवळ चुरीवाला चिश्ती (Village Churiwala Chusti) गावाजवळ ड्रोनची हालचाल दिसली. इतकेच नाही तर पलीकडे चार अनोळखी लोकही आढळून आले. संशय आल्याने बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. गोळीबार होताच ड्रोन मागे आणि ते चारही लोक मागे फिरले आणि पाकिस्तानच्या दिशेने निघून गेले.

ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परत गेल्याावर भारतीय जवानांनी तिथे शोधमोहीम राबवली. या वेळी बीएसएफने 3 पॅकेट हेरॉईन जप्त केले. शोध मोहिमेदरम्यान जवानांना 7 किलो 500 ग्रॅम वजनाचे हेरॉईनची 9 पाकिटे, 2 मॅगझिनसह एक पिस्तूल आणि 9 एमएमच्या 50 गोळ्या या तीन पाकिटांमधून सापडल्या.

दरम्यान, पंजाब पोलीस आणि बीएसएफने संशयितांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. पाठिमागील अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमेपलीकडून ड्रोन पाठविण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवार, 2 डिसेंबर रोजी पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळील एका शेतातून 5 किलोपेक्षा जास्त हेरॉइनसह एक ड्रोन जप्त करण्यात आला. (हेही वाचा, Jammu-Kashmir Update: सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला केली अटक)

ट्विट

बीएसएफच्या जवानांनी विशेष माहितीच्या आधारे राबवलेल्या शोध मोहिमेत एका गावातील शेतात संशयास्पद वस्तू सापडल्या. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान, बीएसएफच्या जवानांनी हिरव्या प्लास्टिकच्या दोन पिशव्यांमधून तीन मोठी पाकिटे जप्त केली ज्यात पाच मॅगझिनसह पाच रायफल आणि 10 मॅगझिनसह पाच पिस्तूल आहेत.