सेंसेक्स । फाईल फोटो

भारतामध्ये कोरोनाचं सावट असताना त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठांसोबतच मुंबई शेअर बाजारावरही झाला आहे. दरम्यान आज (24 मार्च दिवशी) मुंबई शेअर बाजाराच्या प्री- ओपन सेशनमध्ये सकारात्मक स्थिती होती. यावेळेस सेन्सेक्स 4.14% म्हणजे 1074.99 ने वधारला असून 27,057.23 वर होता. मुंबई शेअर मार्केट सकाळी 9.15 च्या सुमारास उघडतो तेव्हा देखील तो ग्रीन सिग्नलवर होता. सेंसेक्स 27,014.41 वर 3.98% ने म्हणजे 1033.17 ने वधारलेला होता. काल शेअर बाजार उघडताच लोअर सर्किट लागल्याने सुमारे 45 मिनिटं व्यवहार ठप्प करण्यात आले होते. काल संध्याकाळी शेअर बाजार 25,981.24 वर बंद झाला होता. आज व्यवहाराची सुरूवात 27,056.23 वर झाली होती. तर या ओपनिंग सेशनमध्ये निफ्टीने 417 अंकांनी उसळी घेत 8,027.25 पर्यंत झेप घेतली होती. तर काल रूपयाचं अवमुल्यन देखील आता सुधारलं आता अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत आज रूपया 18 पैशांनी सुधारला असून तो 76.02 असा सुरुवातीच्या काळात पहायला मिळाला आहे.

PTI Tweets

दरम्यान एशियन बाजारासोबतच आज आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी अमेरिकी बाजारामध्येही सकारात्मकता पहायला मिळाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक नवी उमेद आहे. परिणामी 1000 अंकांच्या उसळीसह आज शेअर बाजार हिरव्या निशाणीवर उघडणं हे चांगले संकेत आहेत.

कोरोना व्हायरसचं थैमान आता जगभर पसरलं आहे. युरोपात कोरोनामुळे बळी जाणार्‍यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने हे जागतिक आरोग्य संकट आता अधिक गंभीर बनत चाललं आहे. जगभरात अनेक महत्त्वाची शहरं लॉकडाऊन असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.