BS Yediyurappa booked under POCSO: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांच्याविरूद्ध 17 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल
Yediyurappa | Twitter

ज्येष्ठ भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री री बी एस येदियुरप्पा  (BS Yediyurappa) यांच्या विरूद्ध पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. आज 15 मार्चच्या सकाळी बेंगलुरू मध्ये  येदियुरप्पा यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 81 वर्षीय येदुरप्पा यांच्यावर 17 वर्षीय मुलीच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.

17 वर्षीय तरूणीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपा नेत्याच्या मिटिंग दरम्यान तरूणी  येदियुरप्पा यांच्याकडे गेली असता त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.  2 फेब्रुवारी 2024  दिवशी आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा हा प्रकार घडल्याचं आईने सांगितलं आहे.  दरम्यान आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजपा नेत्याविरूद्ध POCSO (sexual assault) च्या सेक्शन 8 आणि sexual harassment सेक्शन 354 A अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. Brij Bhushan Singh: बृजभूषण शरण सिंह यांना POCSO मधून दिलासा, दिल्ली पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल .

पहा ट्वीट

दरम्यान या आरोपांनंतर अद्याप  येदियुरप्पा यांच्याकडून कोणतेही जाहीर निवेदन, प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  येदियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून 2008 ते 2011, त्यानंतर मे 2018 मध्ये काही थोड्या काळासाठी आणि त्यानंतर जुलै 2019 ते 2021 पर्यंत मुख्यमंत्री पदी होते. येदियुरप्पा यांनी राजीनामा देताना जनतेचा आपल्यावरील विश्वास उडाला असल्याचं सांगत ते स्टेजवरच भावनाविवश झाले होते. भाजपाने त्यांच्याकडून जबाबदारी Basavaraj Somappa Bommai यांना दिली. जुलै 2021 ते मे 23 दरम्यान Basavaraj Somappa Bommai कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आता Basavaraj Somappa Bommai यांना भाजपाने खासदारकीचे तिकीट दिले आहे.