Air India चे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद तर Vistara चे बुकिंग 15 एप्रिलपासून होणार सुरु
Air India And Vistara (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. हे लॉकडाऊन 14 एप्रिल पर्यंत ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वाहतूक सेवा, विमान सेवा बंद ठेवण्यात आली आहे. 14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलपासून Vistara एअरलाईन्स आपले बुकिंग सुरु करणार आहे. तर दुसरीकडे एअर इंडियाने (Air India) आपले बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिलनंतर केंद्र सरकारच्या निर्णयावर आपला निर्णय अवलंबून असेल असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.

विमानातूनच कोरोना बाधित रुग्ण भारतात आले आणि देशाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून गेला. त्यामुळे ताबडतोब सर्व विमानसेवा बंद ठेवण्यात आल्या आणि बुकिंगही थांबविण्यात आले. यात एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत आपले बुकिंग सेवा बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे विस्तारा या खाजगी एअरलाईन्सने आपले बुकिंग 15 एप्रिलपासून आपले बुकिंग सुरु करणार आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus: देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 2547; 162 जणांना डिस्चार्ज, 62 जणांचा मृत्यू - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

यासोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक संकटामुळे एअर इंडियाच्या वैमानिक आणि अन्य कर्मचा-यांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. यासंदर्भात एअर इंडियाच्या वैमानिकांनी संचालकांना पत्र लिहिलं आहे. पगार कपातीचा निर्णयात दुजाभाव केला गेला आहे. पगार कपातीतून संचालक आणि व्यवस्थापनातील मुख्य अधिकाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. फक्त पायलट आणि कर्मचाऱ्यांवर ही पगार कपात लादली गेली. हा निर्णय आम्हाला अमान्य आहे, असं पायलट संघटनेने पत्रात म्हटलं आहे.

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची नवी आकडेवारी आली आहे. ताज्या माहितीनुसार देशात सद्यास्थितीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे.