दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर सेलने बॉईज लॉकर रूम (Bois Locker Room) नावाच्या खासगी इन्स्टाग्राम ग्रुप विरुद्ध कारवाई करतात या ग्रुप मधील एका 15 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. साऊथ दिल्ली (South Delhi) मधील अल्पवयीन मुलांच्या या ग्रुपवरील काही चॅट्स अलीकडे व्हायरल झाले होते, ज्यात मुलींवरील अश्लील टिपण्या, सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्याबाबत गप्पा, व अल्पवयीन मुलींचे फोटो अश्लील मॉर्फ केलेले फोटो हे सर्व आक्षेपार्ह्य कन्टेन्ट पाहायला मिळत होते. यासंदर्भात एका मुलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून खुलासा केला होता, ज्यांनंतर सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच तापले होते. अनके ट्विटर युजर्सनी या पोस्ट वर दिल्ली पोलिसांचे लक्ष वेधून घेत कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. यानुसार तक्रारीसंदर्भात आता पहिली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. Bois Locker Room Instagram Group Chat हे प्रकरण काय हे सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, एका खासगी शाळेने साकेत पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणाविषयी तक्रार दाखल केली. "त्यांच्या तक्रारीत शाळेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. पोलिसांनी याविषयी तपास करताच ग्रुपवर अश्लील फोटो पोस्ट करणाऱ्या 15 वर्षीय मुलाचा सुगावा लागला होता. त्यानंतर त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करताच त्याचा फोन सुद्धा बंद होता. अखेरीस पोलिसांनी त्याचा पत्ता शोधून सोमवारी संध्याकाळी त्याला ताब्यात घेतले.
तसेच दिल्लीतील महिला आयोग प्रमुख स्वाती मालीवाल यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, या इंस्टाग्राम ग्रुप वरील एका 15 वर्षाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. . यातील सर्व दोषींना लवकरच अटक केली जावी. जरी ते अल्पवयीन असले तरी त्यांना समजले पाहिजे की मुलींना त्रास देणे ठीक नाही! असे मतही मालिवाल यांनी मांडले आहे. दरम्यान या मुलांचे वय हे साधारण 15 ते 18 दरम्यान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता कमी असली तरी त्यांना समज देणे हे आवश्यक असल्याचे नेटकऱ्यांनी सुद्धा म्हंटले होते.