Transgender-Sex Workers Cannot Donate Blood: केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांमध्ये म्हटले आहे की, ट्रान्सजेंडर(Transgender) -सेक्स वर्कर (Sex Workers) रक्तदान (Blood Donate) करू शकत नाहीत. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, रक्तदाते आणि रक्तदान प्राप्तकर्त्यांचा गोळा केलेला नमुना सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या योग्य असल्याचा विश्वास असणे आणि तो मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, केंद्राने ट्रान्सजेंडर व्यक्तींना, पुरुषांना लैंगिक संबंध ठेवण्यास मनाई करणार्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याच्या मागणीला विरोध केला आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे दोन वर्षांहूनही अधिक काळ प्रलंबित असलेल्या याचिकेला प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दिले आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ट्रान्सजेंडर व्यक्ती, एमएसएम आणि महिला सेक्स वर्कर्स यांना रक्तदाता म्हणून वगळणे हे वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे. ज्याला जागतिक पातळीवरही मान्यता आहे. केंद्राने म्हटले आहे की देशातील रक्त संक्रमण प्रणाली (BTS) रक्तदानावर अवलंबून आहे आणि संपूर्ण देशभरात भिन्न असलेल्या आरोग्य प्रणालीच्या गुणवत्तेच्या संदर्भात विद्यमान वास्तविकता लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.
ट्रान्सजेंडर म्हणजे ज्यांची लिंग ओळख किंवा अभिव्यक्ती त्यांना जन्मावेळी नैसर्गिकरित्या मिळालेल्या लिंगापेक्षा भिन्न असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ट्रान्सजेंडर व्यक्तीची लिंग ओळख त्यांच्या जैविक लिंगापेक्षा वेगळी असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती पुरुष म्हणून जन्माला आली आहे. मात्र, तिच्या मनात स्त्रीसूलभ भावना निर्माण होतात. अथवा स्वत:ला ती स्त्री मानते. त्यासाठी ती स्वत:मध्ये तसे बदलही करुन घेते. तिला ट्रान्सजेंडर स्त्री संबोधले जाते. हे उलटही असते. जसे की एखादी व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला येते. मात्र, तिच्या मनात पुरुषी भावना निर्माण होता.ती स्वत:ला पुरुष मानते. तसे वर्तन करते. त्यालाही पुरुष ट्रान्सजेंडर्स म्हणतात. (हेही वाचा, Free Sex Reassignment Surgery: ट्रांसजेंडर लोकांसाठी खूशखबर! लिंगबदल शस्त्रक्रिया, दिल्लीत फुकटात होणार बाईचा पुरुष, पुरुषाची बाई)
ट्विट
Transgender Persons, Gays & Sex Workers Excluded From Blood Donation Based On Scientific Evidence: Centre Tells Supreme Court @Sohini_Chow #SupremeCourt https://t.co/cjRR7XNw9e
— Live Law (@LiveLawIndia) March 11, 2023
दरम्यान, लैंगिक कार्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे काम ज्यामध्ये पैसे किंवा वस्तूंच्या बदल्यात लैंगिक कृती समाविष्ट असते, अशी कृती करणाऱ्या व्यक्तीस सेक्स वर्कर म्हटले जाते. सेक्स वर्कर्स हे अशा कामात गुंतलेले लोक असतात ज्यांमध्ये वेश्यालय, स्ट्रिप क्लब, मसाज पार्लर किंवा एस्कॉर्ट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असू शकतो. काही देशांमध्ये लैंगिक कार्य कायदेशीर आहे, तर इतर अनेक देशांमध्ये ते बेकायदेशीर आहे.