अरूण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी; उद्या 'निगमबोध घाट' वर 2 वाजता अंतिम संस्कार
Arun Jaitley Death (Photo Credits: Twitter)

Arun Jaitley Demise: मोदी सरकारचे 'संकटमोचक' म्हणून ओळख असलेले भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली (Arun Jaitley) यांचे आज ( 24 ऑगस्ट) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिल्ली येथील एम्स रूग्णालयात निधन झाले. अशक्तपणा आणि श्वसनाचा त्रास होत असलेल्या तक्रारीवरुन 9 ऑगस्टपासून रूग्णालयात उपचार घेत असलेल्या अरूण जेटलींची आज प्राणज्योत मालवली. एम्स रूग्णालयातून (AIIMS Hospital) आज त्यांचे पार्थिव शरीर दिल्लीतील कैलाश नगर येथील राहत्या घरी आणण्यात आले आहे. उद्या अरूण जेटलींवर दुपारी 2 च्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अमित शहा, सुरेश प्रभू सह भाजप, कॉंग्रेस नेत्यांकडून अरूण जेटली यांना श्रद्धांजली

निगमबोध घाट परिसरात उद्या अरूण जेटलींवर अंत्यसंस्कार होतील. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीत भाजपा नेते आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Harsh Vardhan)यांनी श्रद्धांजली आणि पुष्पचक्र अर्पण केले आहे. त्यांच्यासोबत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित आहेत. भाजपा नेत्यांसोबतच कार्यकर्ते आणि सामान्यांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. अरूण जेटली यांच्या निधनाने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी - उद्धव ठाकरे

अरूण जेटली यांचे पार्थिव शरीर राहत्या घरी  

आज गृहमंत्री अमित शहा, व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी आपले राजकीय दौरे रद्द करत दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी सध्या अबुधाबीमध्ये आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी Order of Zayed हा यूएईमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यामातून शोक व्यक्त करताना जवळचा साथीदार हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. उद्या 2 वाजता अंतिम संस्कारापूर्वी भाजपा कार्यालयात त्यांचं पार्थिव शरीर 11 नंतर ठेवले जाणार आहे.