Arun Jaitley Demise: अरूण जेटली (Arun Jaitley) 9 ऑगस्टपासून दिल्ली येथील एम्स रूग्णलयात उपचार घेत होते मात्र दिवसेंदिवस प्रकृती खालावत असलेल्या अरूण जेटलींनी आज 12 वाजून 07 मिनिटांनी एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जेटलींच्या निधनाचे वृत्त समजताच राजकारण, सिनेक्षेत्र, क्रीडा क्षेत्रासह सामान्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात भाजपाचे मित्रपक्ष असणार्या शिवसेनेही अरूण जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरूण जेटली यांचे निधन हे ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी असल्याची भावना व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. (Arun Jaitley Passes Away: अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द)
ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अरूण जेटलींच्या निधनानंतर आपला शोक व्यक्त करताना ,'राष्ट्रीय राजकारणातील जेटली यांचे जाणे हे राष्ट्रीय राजकारणातून साहसी व्यक्तीचे जाणे आहे.आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते होतो.रुण जेटली हे निष्णात वकील व धुरंधर नेते होते. ‘संकटमोचक’ म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजपमध्ये नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी जेटली होते.' असे म्हटले आहे. सोबतच 'अरुण जेटली यांच्या निधनामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा खांब कोसळला आहे. जेटली यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. सार्वजनिक जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहूनही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. ' अनेक म्हणत अरूण जेटली यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. अमित शहा, सुरेश प्रभू सह भाजप, कॉंग्रेस नेत्यांकडून अरूण जेटली यांना श्रद्धांजली.
उद्धव ठाकरे यांचे ट्वीट
"राष्ट्रीय राजकारणातील जेटली यांचे जाणे हे राष्ट्रीय राजकारणातून साहसी व्यक्तीचे जाणे आहे. आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते होतो त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 24, 2019
उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांनी देखील अरूण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावत असलेले अरूण जेटली लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होते. त्यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. दरम्यान मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थसंकल्प मधून माघार घेत अमेरिकेत उपचार घेतले होते. मात्र त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावली. उद्या (25 ऑगस्ट) दिवशी अरूण जेटली यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.