BJP chief JP Nadda's convoy attacked | (Photo Credits: ANI)

सध्या पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असलेले भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP national President JP Nadda) यांच्या ताफ्यावर आज (10 डिसेंबर) दगडफेक झाली आहे. जे पी नड्डा यांच्यासोबत भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) देखील होते. त्यांनी या घटनेदरम्यानची हकिकत आणि व्हिडिओ ट्वीटर वर पोस्ट केला आहे. विजयवरर्गीय यांच्या ट्वीट नुसार हा दगडफेकीचा प्रकार सिराकोल बस स्टॅंडजवळ झाला आहे. दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांनी (West Bengal Police) देखील या घटनेची दखल घेत सदर प्रकरणी तपास सुरू असून भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा सुखरूप असून ते सभास्थळी पोहचले असल्याची माहिती दिली आहे.

ANI च्या ट्वीटनुसार, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या कार्यक्रमस्थळी सुखरूप पोहचले आहेत. त्यांच्या ताफ्याला काहीही झालेले नाही. देबीपूर भागात काहींनी अचानक गाड्यांवर दगडफेक केल्याची माहिती दिली आहे. मात्र आता परिस्थिती शांत आहे. सारे सुरक्षित आहे. नेमकं दगडफेकी मागील कारण काय आहे याचा तपास केला जाईल.

ANI Tweet

कैलाश विजयवर्गीय यांचं ट्वीट

दरम्यान पश्चिम बंगाल मधील आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जेपी नड्डा, कैलाश विजयवर्गीय जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. कैलाश यांनी हा प्रकार पोलिसांसमोरच घडल्याचा दावा केला आहे. तर ही दगडफेक टीएमसी कार्यकर्त्यांकडून झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल पोलिसांना नड्डांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती. मात्र ते योग्य बंदोबस्त करण्यासाठी अपुरे पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जेपी नड्डा यांनी कर्यक्रमामध्ये पोहचल्यानंतर आता बंगालमध्ये निश्चितच कमळ फुलणार आहे. ममता बॅनर्जी यांचं सरकार सत्तेमधून जाईल असा विश्वास बोलताना व्यक्त केला आहे.