BJP MP Guman Singh Damor (Photo Credits: ANI)

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आज, 5 ऑगस्ट ला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. संविधानातील कलम 370 (Article 370) रद्द करून जम्मू आणि काश्मीर (Jammu & Kashmir) भागाला देण्यात आलेले विशेष अधिकार काढून घेण्यात आले आहेत, त्यामुळे येत्या काळात अनेक सकारत्मक बदल घडण्याची शक्यता आहे. दरम्यान इतक्या धाडसी निर्णयासाठी मोदी सरकारवर अनेक ठिकाणाहून कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गुमान सिंग दामोर (BJP MP Guman Singh Damor) यांनी मोदी हे तर युगपुरुष आहेत असे म्हणत त्यांच्यासाठी भारतरत्नाची मागणी केली आहे.Article 370: मोदी सरकारचा निर्णय राज ठाकरे यांच्या पसंतीस, ट्विट वरून दिली 'ही' प्रतिक्रिया

आज लोकसभेतील Zero Hour दरम्यान दामोर यांनी ही मागणी उपस्थित केली होती.यावेळी त्यांनी " नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत इतक्या मोठ्या निर्णयासाठी कौतुक केले. तसेच मोदी हे युगपुरुष आहेत देशविदेशाने त्यांचा गौरव केला आहे. आजही काश्मीर संबंधी निर्णय घेऊन त्यांनी कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत,त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी दामोर यांची मागणी आहे.

ANI ट्विट

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मोदी सरकारने विविध ठराव मंजुर करण्याचा सपाटाच लावला आहे. अलिकडेच तिहेरी तलाक विधयेकाला मंजुरी देऊन घेण्यात आलेला निर्णय व त्यानंतर आजचा काश्मीर प्रश्नी घेतलेला निर्णय यामुळे सरकारचे काम जोरदार सुरु असल्याचे समजत आहे.