महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackrey) यांचे केंद्र सरकार प्रतीचे टीकेचे बोल लोकसभा निवडणुकीदरम्यान इतकेच नव्हे तर निकाला नंतरही आपण ऐकले आहेत. मात्र आज राज यांनी चक्क नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारचे कौतुक करत एक खास ट्विट केले आहे. आज, कलम 370 (Article 370) रद्द करत जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) ला दिलेला विशेष अधिकार काढून घेण्यात आला. मोदी सरकारच्या या निर्णयावर राज यांनी कौतुक करत हा निर्णय केंद्र सरकारने गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय असल्याचे म्हंटले आहे. मोदी सरकारने कलम 370 हटवल्याने कश्मीरी तरुणींना होणार फायदा, लागू होणार 'हे' कायदे
राज ठाकरे ट्विट
गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !
After a long time, the Central Govt makes an exceptional decision !
— Raj Thackeray (@RajThackeray) August 5, 2019
खरंतर मोदी सरकारने कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे, मात्र तरीही या निर्णयावर अनेक ठिकाणाहून संमिश्र प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठोपाठ आता मनसेने सुद्धा या निर्णयाची पाठराखण केली आहे, तर काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स चे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या निर्णयाच्या प्रती रोष व्यक्त केला आहे.(जम्मू-कश्मीर आणि लद्दाख यांच्या रुपात देशाला मिळाले 2 नवे केंद्रशासित प्रदेश, येथे वाचा भारतीय राज्यासह UTs ची पूर्ण माहिती)
दरम्यान राज ठाकरे यांनी काही दिवसांपासून मोदी सरकारच्या विरोधात EVM विरोधी मोर्चा पुकारला आहे. या निमित्ताने राज हे विविह राष्ट्रीय नेते मंडळींची भेट घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र आजच्या या निर्णयांनतर राज यांची ही प्रशंसा महत्वाची आहे.