
BJP New National President: भारतीय जनता पक्षाला 20 मार्चपर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष (BJP New National President) मिळू शकतो. सध्या जेपी नड्डा (JP Nadda) ही जबाबदारी सांभाळत आहेत, पण ते केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष पुढील महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करू शकतो. 12 राज्यांमध्ये भाजप अध्यक्षांची निवडणूक पूर्ण झाली आहे. लवकरच आणखी 6 राज्यांच्या अध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील. यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक होऊ शकते.
नियमांनुसार, 18 राज्यांमधील अध्यक्षांच्या निवडीनंतर, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल. भाजपच्या संविधानानुसार, किमान अर्ध्या राज्यांमधील निवडणुकांनंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडता येतात. जेपी नड्डा यांच्यापूर्वी अमित शहा आणि राजनाथ सिंह हे देखील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. (हेही वाचा -Shaktikanta Das Appointed Principal Secretary to PM Modi: RBI चे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती)
दरम्यान, नड्डा यांची राज्यसभेतील सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नड्डा हे गुजरातमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. सध्या जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य, रसायने आणि खते या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाच्या घटनेनुसार, किमान 50 % राज्यांमध्ये राज्य युनिट अध्यक्षांची नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर संघटनात्मक निवडणुकांनंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. विद्यमान पक्षप्रमुख जेपी नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला होता, परंतु सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.