MP Sakshi Maharaj Received Death Threats: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उन्नव येथील खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. हा फोन पाकिस्तानातून आल्याचा दावा करण्यात येत आहे. साक्षी महाराज यांनी म्हटले आहे की, काल (10 ऑगस्ट) त्यांना एकाच फोन क्रमांकावरुन दोन वेळा फोन आला. हा फोन क्रमांक त्यांच्यासाठी अनोळखी होता.
फोन करणाऱ्या व्यक्तीने साक्षी महाराज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, तुमचे घर बॉम्बने उडवून देऊ, असेही तो व्यक्ती म्हणाल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. साक्षी महाराज यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहतीनुसार त्यांना पहिला फोन सोमवारी ( 10 ऑगस्ट) दुपारी 4.24 आणि त्यानंतर दुसरा फोन 4.26 वाजता आला.
साक्षी महाराज यांनी कथीत धमकी प्रकरणी तालुका पोलिस स्टेशन आणि जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (एसपी) उन्नाव आणि गृहमंत्रालयाच्या सचिव कार्यालयात लिखित स्वरुपात तक्रार दिली आहे. (हेही वाचा, DCW: दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाति मालीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात तक्रार दाखल)
भाजप नेते खासदार साक्षी महाराज यांनी प्रसारमाध्यमानंना सांगितले की, फोन करणाऱ्या व्यक्तिने मला शिवीगाळ केली. आपले घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. तसेच, त्याचा दोस्त अब्दुल अफ्फार याला अटक केल्यचे गंभीर परिणाम भोगावे लागलतील असा इशारा दिला. त्याने साक्षी महाराज यांना 10 दिवसात ठार करण्याची भाषा केली, असेही साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.