Spicejet (Photo credit: Wikimedia commons)

Delhi-Shillong Flight Emergency Landing: दिल्लीहून शिलाँगला जाणाऱ्या विमानाला सोमवारी एक पक्षी धडकला. परिणामी पाटणा येथील जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Jay Prakash Narayan International Airpor) या विमानाचे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

पाटणा विमानतळाच्या संचालक आंचल प्रकाश यांनी सांगितले की, 'स्पाईसजेटच्या दिल्ली-शिलाँग फ्लाइटला तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला, ज्यामुळे ते येथील जय प्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. सोमवारी सकाळी 8.52 वाजता विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.' (हेही वाचा -SpiceJet Layoffs: आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून स्पाइसजेटमध्ये नोकर कपात; एअरलाइन्सने 2024 मध्ये सुमारे 2,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले)

कोचीला जाणाऱ्या विमानाचे चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग -

आणखी एका दुसऱ्या घटनेत 100 हून अधिक प्रवासी आणि क्रू सदस्यांसह कोचीला जाणारी जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या विमानाचे सोमवारी चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवासी आणि इतर सुरक्षित आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान 117 प्रवाशांसह कोचीला रवाना झाले. पायलटला नंतर विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर विमान चेन्नईला परतले आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

दरम्यान, चेन्नई विमानतळावरून सकाळी 6.30 वाजता निघालेल्या विमानाला टेकऑफनंतर काही वेळातच समस्या आली. उड्डाणानंतर लगेचच, पायलटने चेन्नई विमानतळ नियंत्रण कक्षाला अलर्ट केले. त्यानंतर फ्लाइटला आपत्कालीन लँडिंगसाठी परत येण्याची सूचना देण्यात आली. तथापि, सकाळी 7:15 वाजता फ्लाइट सुरक्षितपणे उतरवण्यात आले.