Bird Flu: बर्ड फ्लू आजाराने घेतला 2021 मधील पहिला बळी, 11 वर्षीय मुलाचा AIIMS रुग्णालयात मृत्यू
AIIMS Hospital in Delhi (PC - PTI)

देशात कोरोना व्हायरस संसर्गाची लाट कायम असतानाच '[Poll ID="null" title="undefined"]' (Avian influenza) म्हणजेच बर्ड फ्लू आजाराचा रुग्ण दगावल्याचे वृत्त आहे. हरियाणा (Haryana) राज्यातील 11 वर्षीय मुलाचा दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हा मुलगा H5N1 विषाणूने संक्रमित होता. या मुलाच्या रुपात सन 2021 या वर्षातील बर्ड फ्लू आजारामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. या मुलाचा मृत्यू हा H5N1 संसर्गामुळेच झाल्याचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) च्या अहवालातही म्हटले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या मुलाच्या नमुन्यात COVID​​​​-19 चाचणी निगेटीव्ह आली (हा अहवाल अद्याप रुग्णालयात आहे- सूत्र) परंतू इन्फ्लूएंजा चाचणी मात्र पॉझिटीव्ह आली होती. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीनेही याला दुजोरा दिला आहे. निमोनिया आणि ल्यूकेमिया आजाराची लक्षणे घेऊन रुग्णालयात 2 जुलै रोजी दाखल झालेल्या या मुलाचे नाव सुशील असे होते. त्याच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनाही संभाव्य संक्रमनाचा धोका विचारात घेऊन विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा, Bird Flu Strain In Human in China: जगात पहिल्यांदाच मानवामध्ये आढळला बर्ड फ्लूचा H10N3 स्ट्रेन; जाणून घ्या किती धोकादायक आहे )

प्राप्त माहितीनुसार, सुशील याच्या गावात H5N1 चे आणखी काही नमुने गोळा करण्यसाठी तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या उद्देशाने माध्यमातून ए नेशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलची एक टीम हरियाणा येथे पाठवण्यात आली आहे. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला हरियाणा आणि देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लुच्या लाटेमुळे असंख्य पक्षी मृत्यूमुखी पडले होते. यात कोंबडी, चिमणी, कावळे, मोर अशा पक्षांचा समावेश होता. काही ठिकाणी बगळेही मृत्यमुखी पडले होते.