नोबेल विजेते आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन (Amartya Sen) यांनी 'जय श्रीराम' घोषणेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 'जय दूर्गा' या घोषणेप्रमाणे 'जय श्री राम' हा नारा बंगाली संस्कृतीचा भाग नाही. तसेच, 'जय श्रीराम' (Jai Shri Ram) घोषणेचा वापर लोकांना मारहाण करण्याच्या उद्देशाने केला जातो, असेही अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.
अमर्त्य सेन यांनी पश्चिम बंगाल राज्यातील सध्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण यावर भाष्य केले आहे. कोलकाता (Kolkata) येथील जादवपूर विद्यापिठात बोलताना अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी म्हटले की, आजकाल बंगालमध्ये श्रीरामनवमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या आधी असे कधीच दिसले नाही. पण, जय श्रीराम या घोषणेचा बंगाली संस्कृतीशी काहीच संबंध नाही. दूर्गामाता बंगालच्या समाजजीवनात सर्वव्यापी आहे, असेही सेन यावेळी म्हणाले. (हेही वाचा, ठाणे: जय श्रीराम म्हणण्यासाठी मुस्लिम तरुणाला धमकावणाऱ्या तिघांना अटक)
गेल्या काही काळापासून जय श्रीराम ही घोषणा पश्चिम बंगालच्या राजकारणात एक महित्त्वाचा मुद्दा ठरली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही भाजपवर आरोप केला आहे की, भाजप पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरण करत आहे. समाजीक वातावरण दुषीत करण्यासाठी भाजप जय श्रीराम हा नारा भाजप देत असल्याचेही तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. लोकसभा निवडणूक 2019 पासून भाजप पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम ही घोषणा मोठ्या प्रमाणावर देत आला आहे.