Bihar Mafia Raj: बिहारमधील वाळू आणि खाण माफियांच्या (Sand Mining Mafia) गुंडांनी सोमवारी खाण विभागाच्या पथकावर हल्ला केला. यात महिला अधिकाऱ्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी महिला अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली, केस ओढून फरफटतही नेले.असे पोलिसांनी सांगितले. बिहटा परिसरात अवैध खाणकाम रोखण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून अधिकारी पाहणीसाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गुंडांनी अधिकाऱ्यांच्या पथकावर दगडफेक सुरू केल्याने महिला अधिकारी अम्या कुमारी जखमी झाल्या. हल्लेखोरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. या प्रकरणात आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवून पोलिसांनी 44 जणांना अटक केली आणि 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Bihar Viral Video) झाला आहे.
आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी घटनेवर प्रतिक्रिया देताना वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, त्यांच्या सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाटणा जिल्हा प्रशासनाने एका निवेदनात सदर घटनेबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, बिहटा परिसरात बेकायदेशीर खाणकाम रोखण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून एक पथक तपासणी आणि शोधासाठी गेले होते तेव्हा ही घटना घडली. तपासणी पथक कोइलवार पुलाजवळ आले असता अधिकार्यांवर समाजकंटकांनी हल्ला केला. आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक सुरू करताच अम्या कुमारी खाली पडल्या आणि जखमी झाल्या, असे पाटणा जिल्हा प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे. या वेळी अन्य दोन अधिकारी (जिल्हा खाण अधिकारी कुमार गौरव आणि खाण निरीक्षक सईद फरहीन देखील जखमी झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. (हेही वाचा, Shimla Fruit Market Video: फळ विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी, शिमला फ्रूट मार्केटमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
ट्विट
#WATCH | Bihar: Woman officer from mining department dragged, attacked by people allegedly involved in illegal sand mining in Bihta town in Patna district.
(Note: Abusive language; viral video confirmed by police)
44 people arrested, 3 FIRs filed while raids underway to arrest… pic.twitter.com/EtKW1oedG3
— ANI (@ANI) April 17, 2023
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस लवकरच या घटनेमागील सूत्रधाराला पकडतील, अशी प्रतिक्रिया पाटणा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) राजीव मिश्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.