बिहार (Bihar) मधील चार आमदार आक्षेपार्ह कृत्य असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. इम्फाल टाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूर (Manipur) येथे स्टडी टूरसाठी गेलेल्या बिहारचे चार आमदार एका तरुणीसोबत डान्स करताना दिसून आले. रिपोर्ट्सनुसार, भारत-मान्यमार सीमेवर असणाऱ्या मोरेह शहरात एका तरुणीसोबत जबरदस्तीने डान्स करत आहेत. आमदार यदुवंश कुमार यादव यांच्यासह तीन आमदारांना 1 जून रोजी त्यांना मोरेह येथे दौऱ्यावर पाठवण्यात आले होते.
यदुवंश कुमार यादव त्यांच्यासोबत असलेल्या अन्य टीम मधील आमदारांचे नेतृत्व करत होते. त्यामध्ये भाजपचे सचिन प्रसाद सिंह, जेडीयूचे राज कुमार राय आणि आरजेडीचे शिवचंद्र राम यामध्ये सामील होते. तर व्हिडिओत बिहारच्या आमदारांनी तरुणीच्या खांद्यावर हात ठेवत नाचत असल्याचे दिसून आले. मात्र तरुणी या आमदारांचा हात वारंवार बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती.
(विकृत: महिलांची हत्या करून प्रेतासोबत सेक्स; सीरियल किलर जेरबंद, 12 हल्ल्यात 5 जणींचा बळी)
आमदारांचा कॅमेऱ्यात कैद झालेला डान्स हा आक्षेपार्ह आहे. तर भाजपचे आमदार बिहार मधील कल्याणपूर क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात. तर जेडीयूचे आमदार हसनपुर आणि आरजेडीचे आमदार राजापाकड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले जात आहे.