लग्नाच्या बोहल्यावर चढायला अवघे काही तास बाकी असतानाच ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlour) मेकअप (Wedding Makeup) घेणाऱ्या नवरी मुलीवर गोळीबार (Firing on Bride Girl) झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा गोळीबार कोणी सराईत गुन्हेगाराने नव्हे तर चक्क बिहार पोलीस दलातील एका कॉन्स्टेबल (Bihar Police Constable) पदावरील व्यक्तीने केला आहे. पीडित तरुणीने आरोपसोबत विवाह करण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पुढे आले आहे. ही घटना बिहारमधील मुंगेर येथे घडली. पीडिता 26 वर्षीय तरुणी आहे.
पीडित तरुणीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यातत आले आहे. पीडिता उपचाराला प्रतिसाद देत आहे आणि सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले आहे. तरुणीचा एका तरुणासोबत विवाह ठरला होता. घटना घडली त्याच रात्री तिचा विवाह होणार होता. मुहूर्त जवळ आल्याने ती नवरीचा मेकअप घेण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. दरम्यान, अमन कुमार नावाचा बिहार पोलीसदलातील कॉन्स्टेबल तिथे आला. त्याने कोणताही विचार न करता सोबत आणलेले पिस्तूल काढले आणि तरुणीवर रोखून गोळीबार केला. (हेही वाचा,Rajasthan: सात वर्षाच्या मुलीची 38 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्नासाठी 4.5 लाख रुपयांन विक्री, राजस्थान राज्यातील घटना )
पोलीस कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात तरुणी जखमी झाली. तिच्या डाव्या खांद्याला आणि आणि छातीच्या उजव्या बाजूला मोठी इजा झाली. दरम्यान, वधूवर गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वत:वरही गोळीबार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल सटकल्याने त्याला त्यात यश आले नाही. या घटनेनंतर पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने शताफीने पळ काढला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याला पकडता आले नाही. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.