Bihar: बिहार मधील शासकीय शाळेच्या शिक्षकांचा एक व्हिडिओ तुफान सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शिक्षक आपल्या डोक्यावर गोणपाट घेऊन ती विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाकडून गोणपाट विक्री केली जात असल्याचे पाहताच लोकांना सुद्धा धक्का बसला. यामुळे एकच चर्चा सुरु झाली की, शासकीय शिक्षक असून सुद्धा त्याचा गोणपाट विकावी लागत आहेत. हे प्रकरण काही वेगळेच होते. तपास केल्यानंतर सत्य अखेर उघडकीस आले. खरंतर मिड-डे मील योजनेअंतर्गत गोपणाटांच्या पोत्यांमधून राशन भरुन येते. त्यानंतर ही पोती खाली करुन विक्री केली जात आहे. डोक्यावरील गोणपाट विक्री करणाऱ्या या शिक्षकाकडून याबद्दल माहिती काढली तेव्हा त्याने सरकावर जोरदार टीका केला. त्याने असे म्हटले की, सरकारकडून असा आदेश आला आहे. अन्यथा पगार मिळणार नाही. यासाठी खाली झालेली गोणपाटांची पोती विक्री करत आहे.
समोर आलेले प्रकरण हे कटिहार जिल्ह्यातील आहे. कदवा प्रखंड क्षेत्रात कांता मध्य विद्यालयातील मुख्य शिक्षकासह बिहार राज्या प्रारंभिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तमीजउद्दीन यांच्या डोक्यावर गोणपाट असून ती गावोगाव विक्री केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये शिक्षक गोणपाटाशिवाय गळ्यात एक पाटी घालून असल्याचे ही दिसून येत आहे. त्यामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली आहे. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांचे काय हाल केले जात आहेत ते दाखवण्यात आले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, सरकार 2015-26 दरम्यान ते आतापर्यंतच्या गोणपाटांचा हिशोब मागत आहेत.(Madhya Pradesh Crime: भोपाळमध्ये दुचाकी उचलल्याच्या रागात तरुणाने वाहतुक पोलिसावर केला हल्ला, आरोपीवर गुन्हा केला दाखल)
एक शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करेल की ही गोणपाट विकण्याचे. सरकारकडून जबरदस्तीने किचनचे काम करवून घेणे, शिक्षकांना एमडीएममध्ये भागीदार बनवणे, शिक्षकांकडून गोणपाटांचा हिशोब मागणे या सर्व गोष्टी अत्यंत चुकीच्या आणि दु:खद आहेत. जर एखाद्या ठिकाणी 5-6 वर्ष गोणपाट ठेवली गेली असतील तर ती उंदरांकडून कुरतडली जाणार. त्यामुळे त्याची किंमत दोन रुपये सुद्धा राहणार नाही. अशातच आता सरकार या प्रति गोणपाटांच्या मागे 10 रुपयांनी हिशोब मागत आहे. अशा परिस्थितीत एक शिक्षक गोणपाट विक्री की खरेदी करेल का? तसेच बहुतांश शिक्षक बदलले आणि सेवानिवृत्त झाले आहेत. सरकारकडून जो पर्यंत हे निर्देशन पाठी घेत नाही तोपर्यंत शिक्षकांकडून अशाच पद्धतीचा विरोध केला जाणार आहे. त्याचसोबत त्यांनी आपल्याकडून एका नोटीस असे म्हटले की, राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्षांच्या डोक्यावर गोणपाट घेऊन गावात बसून सरकारच्या या निर्देशनाला चुकीचे ठरवण्याचे अपील केले आहे.