बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) साठी पहिल्या टप्प्याचे मतदान काल (29 ऑक्टोबर) पार पडले. आता दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी बिहारमध्ये निवडणूक प्रचार जोरदार सुरु आहे. प्रचारासदरम्यान, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी नवा डाव खेळला आहे. ज्याची देशभर चर्चा सुरु झाली आहे. नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी पश्चिम चंपारण येथील वाल्मीकिनगर (Balmikinagar येथली प्रसार सभेत बोलताना म्हटले की, 'आम्हाला असे वाटते की, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण (Reservation) मिळायला हवे. लोखसंख्या समजण्यासाठी जनगणना करुन हा निर्णय घेता येईल. हा निर्णय आमच्या हातात नाही'. नीतीश कुमार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्याची देशभर चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या वेळी बोलताना सांगितले की, मला मतांची चिंता नाही. तुम्ही मला आगोदर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी खूप काम केले. जर तुम्ही संधी दिली तर काम करण्यासाठी मी पुन्हा आपल्याकडे येईन. अद्यापही काही समस्या राहिल्या असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन.
वाल्मीकि नगर प्रदेशनात थारु समाजाचे अधिक मतदार आहे. या समाजाचा समावेश अनुसूचित जाती-जनजातीत करावा अशी खूप दिवसांपासून मागणी केली जात आहे. या मागणीचे समर्थन करत नीतीश कुमार यांनी म्हटले आहे की, जनगणना करणे हे आमच्या हातात नाही. परंतू, आम्हाला वाटते की लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळायला हवे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: मुलींवर नव्हता विश्वास, जन्माला घातली 9-9 मुले; नीतीश कुमार यांची जीभ घसरली, नाव न घेता लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका)
दरम्यान, लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यायचे तर त्यासाठी जणगणा करावी लागणार आहे. जणगणना करुन लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हा अत्यंत स्फोटक विषय आहे. देशभरातून या मुद्द्यावर विविध प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. नीतीश कुमार यांनी निवडणूक प्रचारात हा मुद्दा वापरला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जनते काय प्रतिक्रिया देते हे प्रत्यक्ष निकालादिवशीच कळणार आहे.