(Photo Credits: ANI)

सरकारी योजनांमध्ये गोंंधळ होण्याची अनेक उदाहरणे आपण आजवर ऐकली असतील मात्र बिहार (Bihar) च्या मुझफ्फरपूर (Muzzafarpur) जिल्ह्यात घडलेला हा एक अलिकडचा प्रकार ऐकुन तुम्ही सुद्धा डोके धराल. केंद्र सरकार (Central Government) तर्फे स्त्रीभृण हत्येला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अनेक उपक्रमांंपैकी एक म्हणजेच राष्ट्रीय हेल्थ मिशन (National Health Mission) अंतर्गत मुलीला जन्म देणार्‍या मातेला सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाते. या उपक्रमाला मागील काळात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मात्र या उपक्रमाचा गैरफायदा घेत बिहार मध्ये एका 65 वर्षांच्या महिलेने 14 महिन्यांच्या कालावधीत 8 मुलींना जन्म दिल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिलेच्या अकाउंट वर योजनेच्या अंतर्गत मिळणारी मदत सुद्धा ट्रान्सफर केलेली आहे.

अहवालानुसार, मुसहरी ब्लॉकमध्ये घडलेल्या या विचित्र घटनेबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी उपेंद्र चौधरी यांनी माहिती शोधून काढली आणि स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. प्राप्त माहितीच्या आधारे लीला देवी नामक महिलेच्या नावावर ही नोंद आहे. प्रत्येक मुलीच्या जन्मापाठी 1400 रुपये असे 8 मुलींचे तब्बल 11, 200 रुपये तिच्या खातात जमा करण्यात आले होते.

ANI ट्विट

दरम्यान या भागातुन समोर आलेले हे एकमेव प्रकरण नसुन शांती देवी नावाच्या महिलेच्या नावे नऊ महिन्यांत पाच मुलींचा जन्म तर सोनिया देवी नावाच्या पाच महिन्यांत चार मुलींच्या जन्माची नोंंद केलेली आहे.हा घोटाळा उलगडल्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.