PM Narendra Modi Birthday on September 17: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कडून 14-20 सप्टेंबर दरम्यान 'सेवा सप्ताह'चे आयोजन
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून आठवडाभराचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. 14 ते 20 सप्टेंबर हा आठवडा 'सेवा सप्ताह' (Seva Saptah) म्हणून साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षी देखील पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आणि भाजपाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा (BJP working president JP Nadda ) यांनी आठवडाभराचा कार्यक्रम सुरु केला होता.

सेवा सप्ताहामध्ये भाजप कडून देशभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसंच पंतप्रधान मोदी यांच्या चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येते. त्याचबरोबर मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. रिपोर्टनुसार, यंदा मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून मास्कचे वाटप, रक्तदान शिबिरं, गरिबांमध्ये अन्न-फळांचे वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. (वाराणसीच्या संकट मोचन मंदिरामध्ये मोदी चाहता अरविंद सिंह कडून 1.25 किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण)

ANI Tweet:

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मास्क वाटप आणि रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमांनामुळे नागरिकांना नक्कीच फायदा होईल. तसंच स्वतःच्या सुरक्षेचा संदेशही लोकांपर्यंत पोहचेल, असे भाजपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हणणे आहे. सोशल डिस्टसिंगचे भान राखत हे कार्यक्रम बुथ-लेव्हलवर पार पाडले जातील, अशी माहिती सुत्रांनी ThePrint ला दिली आहे. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना रुजवण्यासाठी देखील कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले आहे.