IIT-BHU Case: आयआयटी-बीएचयूच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी
Arrested | (File Image)

वाराणसी येथील संस्थेच्या बाहेर दोन महिन्यांपूर्वी आयआयटी-बीएचयू (IIT-BHU Student Molestation Case) विद्यार्थिनीच्या कथित विनयभंगाच्या प्रकरणी तिघांना रविवारी (31 डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. हे तिघेही सत्ताधारी भारतीय जनता (BJP) पक्षाशी संबंधित आहेत. याप्रकरणी भाजपने तिन्ही आरोपींना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. तिन्ही आरोपी पक्षामध्ये कोणत्या पदावर होते किंवा विंगमध्ये होते हे भाजपकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. (हेही वाचा - IIT-BHU Case Accuse Arrested: आयआयटी-बीएचयूच्या  बलात्कार, तिघांना अटक; आरोपी भाजपशी संबंधीत)

वाराणसी भाजप जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी सांगितलं की, तिन्ही तरुणांना पक्षातून काढून टाकण्यात आलंय. पुढील कारवाई पक्षाच्या निर्देशानुसार होईल. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं होतं. कोर्टाने त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. दोन महिन्यापूर्वी आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. तब्बल 60 दिवसांनी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींचे नाव कुणाल पांडेय, अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल असे आहेत. तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याने विरोध पक्षांनी जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे.

पाहा पोस्ट -

सदर प्रकरणावरुन राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागल्याने सध्या हे प्रकरण प्रसारणमाध्यमामध्येही चर्चेत आहे. विद्यार्थी संघटनांनीही या घटनेचा निषेध केला आहे.