'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) आयोजित करुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत पिंजून काढत आहेत. या यात्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक सामान्य नागरिकही उत्स्फुर्त सहभागी होत आहेत. यात अबालवृद्धांचा समावेश आहे. खास करुन लहान मुले, महिला आणि वृद्ध स्त्रिया, कामगार, शेतकरी असे अनेक लोक राहुल गांधी यांना भेत आहेत. या भेटीचे हृदयस्पर्षी व्हिडिओ, फोटो (Bharat Jodo Yatra Photos, Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत जोडो यात्रेतील काही हृदयस्पर्षी व्हिडिओ (Rahul Gandhi Heartwarming Moments), फोटो आपण येथे पाहू शकता.
प्रेमाचा संवाद
काँग्रेसने ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, राहुल गांधी यांच्याभोवती मोठी गर्दी आहे. ते एका वृद्ध महिलेशी मोठ्या प्रेमाणे संवाद साधत आहेत. ती महिला काँग्रेस नेत्याच्या (राहुल गांधी) खांद्यावर थोपटून त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहे. व्हिडिओत शेवटी पाहायला मिळते की, ही महिला राहुल गांधी यांना मिठी मारते. मग राहुल गांधी पुढील यात्रेसाठी मार्गक्रमण करतात. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आली आहे 'प्रेमाचा संवाद' (हेही वाचा, Bharat Jodo Yatra: कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा 9 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज)
व्हिडिओ
'ममता' की छाँव#BharatJodoYatra pic.twitter.com/YFv4zwQ4YA
— Congress (@INCIndia) October 20, 2022
एक हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण
राहुल गांधी यांच्या 7 सप्टेंबर रोजी निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या पायी पदयात्रेने नुकताच 1,000 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. संपूर्ण प्रवासात राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी यात्रेकरू लोकांशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्यासोबतचे खास क्षण शेअर करत आहेत.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी
राहुल गांधी यांच्यासोबत त्यांच्या आई सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा, कर्नाटकातील मंड्या येथे सामील झाल्या होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला कोविड-19 ची लागण झाल्यानंतर सोनिया गांधी यांचा हा पहिलाच सार्वजनिक जाहीर प्रवास होता. पक्षाने ट्विटरवर एक फोटो देखील शेअर केला होता ज्यात राहुल गांधी हे आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधताना दिसतात.
ट्विट
मां ❤️ pic.twitter.com/0UgqF9hfw6
— Congress (@INCIndia) October 6, 2022
लहान मुलीला अश्रू अनावर
दरम्यान, याआधी, पायी मार्चचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात राहुल गांधींना भेटल्यानंतर एका मुलीला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. यात ती मुलगी आनंदाने उडी मारताना, हसत आणि रडत होती. त्यानंतर तिला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.
ट्विट
No caption needed.
Only love ♥️#BharatJodoYatra pic.twitter.com/LSnbCEBk5v
— Bharat Jodo (@bharatjodo) September 28, 2022
दरम्यान, याआधी, पायी मार्चचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात राहुल गांधींना भेटल्यानंतर एका मुलीला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. यात ती मुलगी आनंदाने उडी मारताना, हसत आणि रडत होती. त्यानंतर तिला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.
भारत जोडो यात्रेअंतर्गत राहुल गांधी सुमारे पाच महिन्यांत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा दौरा करणार आहेत.