Bharat Jodo Nyaya Yatra: आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं, रस्त्यावरच धरणे आंदोलन
Rahul Gandhi | Twitter

आज काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी (Bharat Jodo Nyaya Yatra) आसाममध्ये (Assam) आहेत. या यात्रेदरम्यान आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. यानंतर ते तिथेच धरणे आंदोलनावर बसले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. जो सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहे. 15 व्या शतकातील आसामी संत आणि विद्वान श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नागाव येथील बटाद्रवा सत्ता मंदिरात जाताना राहुल गांधींना रोखले गेले.  (हेही वाचा - Bharat Jodo Nyay Yatra: आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राडा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला)

आसाममध्ये सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी 15 व्या शतकातील आसामी संत आणि विद्वान श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या नागाव येथील बटाद्रवा सत्ता मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मंदीरातील प्रशासनाने प्रवेश दिला नाही. राहुल गांधींचा आरोप आहे की, त्यांना मंदिराच्या 15 किलोमीटर आधी थांबवण्यात आले.

राहुल गांधी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. यावेळी राहुल गांधींचे सर्व कार्यकर्ते टाळ्या वाजवत 'रघुपती राघव राजा राम' म्हणत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ काही मिनिटांतच 2 लाख 83 हजार लोकांनी पाहिला आहे.