Bharat Band: गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनामुळे देशातील वातावरण तापले आहे. हरियाणात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन दिवसांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशात आता आता संयुक्त किसान मोर्चा, 10 केंद्रीय कामगार संघटना आदींनी उद्या म्हणजेच शुक्रवारी देशव्यापी संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. उद्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंदच्या या काळात फळे, भाजीपाला आणि दुधाच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये व्यापारी वर्ग सहभागी होणार नाही.
उद्या देशभरातील सर्व बाजारपेठा नेहमीप्रमाणे खुल्या राहतील आणि व्यवसाय सुरळीतपणे सुरू राहतील. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने ही माहिती दिली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, उद्याच्या भारत बंद दरम्यान व्यापारी लोक त्यांची दुकाने उघडी ठेवतील. जनतेला आवश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली असली तरी आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आमची दुकाने उघडी ठेवू. या काळात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपल्या सदस्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
#WATCH | Farmers' protest | Farmer leader Rakesh Tikait says, "We have spoken about 'Gramin Bharat Bandh' - that farmers do not go to their farms tomorrow. This will send a big message tomorrow...This agitation has a new ideology, a new method. Highways will not be shut. But… pic.twitter.com/ahJjcTtRQm
— ANI (@ANI) February 15, 2024
वृत्तानुसार, भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत चालणार आहे. शेतकरी देशभरातील प्रमुख रस्ते रोखण्याचा प्रयत्न करतील. पंजाबचे रस्ते चार तास बंद ठेवण्याची योजना आहे. भाजीपाला आणि धान्य खरेदी आणि पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवा बंद केल्या जातील. बंद दरम्यान गावातील दुकाने, धान्य बाजार आणि सरकारी व निमसरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भारत बंदमध्ये रोडवे कर्मचारी संघटना सहभागी होत असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा निलंबित करण्यात येणार आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh Video: टोल प्लाझा कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, यमुना एक्स्प्रेसवरील घटना कॅमेरात कैद)
मात्र उद्या बँका सुरू राहणार आहेत. त्या सामान्यपणे कार्य करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या हॉलिडे मॅट्रिक्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारत बंद दरम्यान, आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा, मेडिकल आणि अत्यावश्यक कार्यक्रम जसे की विवाह आणि शालेय कामकाजावर परिणाम होणार नाही.