Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील टोल प्लाझावर कर्मचारी आणि तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना यमुना द्रुतगती मार्गावरील जेवर टोल प्लाझा येथे घडली. त्यानंतर कार चालकाने पळून जाताना टोल कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार नेली. यात कर्मचारी जमिनीवर पडले. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कर्मचारी आणि प्रवाश्यामध्ये जोरात भांडण झाल्याचे दिसत आहे. ही घटना सोमवारी (12 फेब्रुवारी) सायंकाळी 4 च्या सुमारास जेवर पोलिस स्टेशन हद्दीतील जेवर टोल प्लाझा येथे घडली. टोल मागितल्यावर कर्मचारी आणि प्रवासीमध्ये भांडण चालू झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)