खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मान यांच्यावर हल्ला करण्यासाठी सर्व गँगस्टरना एकत्र येण्याचे आवाहन देखील त्याने केल्याची माहिती पंजाब पोलिसांमधील वरिष्ठ सूत्रांनी दिल्याचं इंडिया टुडे चं वृत्त आहे. पंजाब पोलिस यानंतर सतर्क झाले आहे. पोलिस महासंचालक गौरव यादव (Gaurav Yadav) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून गॅंगस्टर्स विरोधात कडक धोरणं अवलंबली जातील आणि अनुचित प्रकार करणार्यांना कडक शासन दिले जाईल.
भगवंत मान 26 जानेवारीला जेथे झेंडा फडावतील तेथे ते वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील गुंडांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले असून राज्यातील गुंडांवर कारवाई सुरू झाली आहे. दहशतवादी पन्नूला गुंडांवर कठोर कारवाईचा बदला घ्यायचा आहे आणि तो त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे. त्यामुळेच त्याने गुंडांना आपल्यासोबत येण्यास सांगितले आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी पंजाब पोलिसांच्या प्रयत्नांचा खलिस्तानी दहशतवाद्याने निषेध केला आहे. व्हिडिओमध्ये पन्नू पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकींबद्दल बोलत होता. यासोबतच पन्नू पंजाबच्या गुंडांना व्हिडिओमध्ये त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगत आहे. त्यांनी सीएम मान यांचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग असे वर्णन केले आणि पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांची तुलना माजी डीजीपी गोविंद राम यांच्याशी केली. खलिस्तानी आतंकवादी Gurpatwant Singh Pannun ने मैदानात Virat Kohali ला मिठी मारण्याचा प्रयत्न करणार्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला जाहीर केलं 10 हजार डॉलर्सचं बक्षीस!
खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू, खलिस्तानी फुटीरतावादी आणि शीख फॉर जस्टिस संघटनेचा संस्थापक आहे. त्याने काही दिवसांपूर्वी भारताला अनेक धमक्या दिल्या आहेत. मागच्या महिन्यात पन्नूने एक व्हिडिओ मेसेज शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने भारतीय संसदेवर 13 डिसेंबर रोजी हल्ला करणार असल्याची धमकी दिली होती. 13 डिसेंबर 2001 दिवशी दहशतवादी अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच पुन्हा हल्ला करण्याचे संकेत त्याने दिले होते. Lok Sabha Security Breach: खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannun ने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाख रुपयांची कायदेशीर मदत.
पेशाने वकील असलेल्या पन्नूचे कुटुंब आधीपंजाबच्या नाथू चक गावात राहत होते, जे नंतर अमृतसरजवळ खानकोट येथे स्थायिक झाले. 1991-92 मध्ये, पन्नू अमेरिकेला गेला. जिथे त्याने कनेक्टिकट विद्यापीठात प्रवेश घेऊन फायनान्समध्ये एमबीए केले आणि न्यूयॉर्क विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. 2007 मध्ये पन्नू ने शिख फॉर जस्टिसची स्थापना केली. ही संघटना स्वतःला मानवाधिकार संघटना म्हणवते, पण भारताने तिला 'दहशतवादी' संघटना घोषित केले आहे.