BEST Bus Caught Fire In The Goregaon Area Of Mumbai (Photo Credits: File Photo)

गोरेगाव: मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील दिंडोशी (Dindoshi) परिसरात एका बीएसटी (BEST Bus)च्या बसला आग लागल्याची घटना समोर येत आहे. दिंडोशी येथील कन्यापाडा, गोकुळधाम कॉलोनी (Gokuldham Colony) मध्ये उभ्या असलेल्या या बसने आज सकाळी साडे सातच्या दरम्यान अचानक पेट घेतला. यानंतर संपूर्ण बस अवघ्या काहीच मिनिटात जळून खाक झालेली दिसून आली. या जळत्या बसचा एक व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

गोरेगाव रेल्वे स्थानकातून निघालेली ही बस नागरी निवारा प्रकल्पाच्या दिशेने जात असताना सीएनजी टॅंक मध्ये दबाव वाढल्याने एक विशिष्ट प्रकारचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर लगेचच बसच्या डाव्या चाकात दबाव न सहन झाल्याने या टॅंक ने पेट घेतला. संपूर्ण बसमधील दोन रिअर टायर्स वगळता अख्खी बस जाळून खाख झाली आहे, यानंतर या बसला दिंडोशी बस डेपो मध्ये नेण्यात आले आहे. Mumbai Fire: माटुंगा येथील 'बिग बाजार'ला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना

ही घटना घडत असताना बसमध्ये केवळ बसचालक आणि कंडक्टरच उपस्थित होते. बसला आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी  तात्काळ बसमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यानंतर फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.