Image used for represenational purpose (File Photo)

बेंगळुरू: अनेकदा तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजीने न घेतल्यास तोंडाला दुर्गंधी (Bad Breath) येण्यासारख्या प्रसंगावरून शरमेने मन खाली घालावी लागते. मात्र बेंगळुरू (Bengaluru)  मध्ये हे कारण एकाच्या जीवावर बेतल्याचे समजत आहे. मावल्ली मशीद परिसरात एका मित्राने आपल्या मित्राच्या तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे मिठी मारण्यास नकार दिला यावरून त्या मित्राला इतके अपमानित झाल्याचे वाटले की त्याने चक्क आपल्या जवळील चाकूने आपल्याच मित्राला भोसकले. याप्रकरणी पोलिसांनी नबी उर्फ बल्ली याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. केळ्यांमधून कैद्यांना पैसे पुरवले जातात? व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रवाल (Video)

काय होत नेमकं प्रकरण ?

TOI च्या माहितीनुसार शोएब पाशा (23 ) याला बेंगळुरुमधील एलबीएफ रस्त्यावरून दुचाकी चालवत जात असताना त्याचा मित्र नबी दिसला म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी बाइक थांबवली. नबीने त्याच्याशी हात मिळवला आणि त्याला मिठी मारण्यासाठी तो पुढे आला. पण त्याने जवळ येण्याचा प्रयत्न करताच शोएबने त्याच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याचं कारण देत त्याला दूर केले . यामुळे नबीला राग आला आणि दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले आणि भररस्त्यात चाकू काढून नबीने शोएबला पोटात भोसकले. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे 10 घरगुती उपाय

यावेळी शोएबचा लहान भाऊ शाहीद याने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला , मात्र शाहीद येताच त्याच्यावरही चाकूहल्ला करून नबी फरार झाला. स्थानिकांनी लगेच दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. दोघांची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान पोलिसांनी नबीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मंगळवारी अटक केल्यानंतर नबीला कोर्टा समोर सादर करण्यात आले आहे.