हत्तीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न अंगलट; युवकाची थेट रवानगी रुग्णालयात
Elephant | (Photo Credit:- Pixabay)

हत्तीचे (Elephant) चुंबन (Kiss)घेण्याचा प्रयत्न कर्नाटक राज्यातील एका तरुणाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. फिल्मी स्टाईलने चुंबन घेण्याच्या प्रयत्नात नशेच्या अंमलाखाली असलेल्या या तरुणाला हत्तीने असा काही हिसका दाखवला की, त्याची थेट रवानगी रुग्णालयातच झाली. ही घटना बंगळुरु (Bengaluru) शहरापासून सुमारे 50 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मालूर परिसरात घडली. कर्नाकट पोलीस विभागाचे एक अधिकारी सहा हत्तींची झुंड कर्नाटक-तामिळनाडू राज्याच्या सीमेवरुन जंगलाच्या दिशने घेऊन जात होते. दरम्यान, हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या एक आठवड्यापासून वन विभाग हत्तींच्या एका कळपाला जंगलात परत पाठविण्यासाठी प्रयत्न करत आहे. हत्तीच्या या कळपाने डीएन डोड्डी गावाजवळ असलेल्या काही अंब्यांच्या बागा आणि काकडीच्या शेताचे मोठे नुकसान केले. त्यानंतर परीसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण आणि स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस आणि वनविभाग हत्तींची झुंड जंगलात परत पाठविण्यासाठी प्रयत्न करत होता.

दरम्यान, पोलीसांचे पथक हत्तीचा कळप (झुंड) जंगलात पाठविण्याचा प्रयत्न करत असताना गावकऱ्यांनी हत्तीचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. काही लोकांनी तर हत्तीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे हत्ती बिथरले. त्यांनी इकडेतिकडे धावण्यास सुरुवात केली. हत्तींचा रुद्रावतार पाहून लोकांनी एकच धूम ठोकली.

Elephant | (Photo Credit:- Pixabay)

दरम्यान, राजू नावाचा एक युवक नशेच्या अंमलाखाली होता. त्याने हत्तीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे राजू या तरुणाला हत्तीचे चुंबन घेतानाचा फोटो काढायाचा होता. त्यासाठी तो हत्तीच्या अगदी जवळ गेला. आगोदरच बिथरलेल्या हत्तीने त्याला जोरदार हिसका दाखवला. घाबरलेला राजू इतर लोकांप्रमाणेच सैरावैरा पळू लागला. जखमी अवस्थेत धावताना तो यूकेलिप्टस नावाच्या झाडाला धडकला.

दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार राजू हा एका कन्नड चित्रपटाबाबत बोलत होता. त्या चित्रपटात हिरोने हत्तीचे चुंबन घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच हत्तीला चुंबन करने त्याच्या अंगलट आले. (हेही वाचा, महिन्याभरात पुण्यातील ट्रायडल नगर सोसायटीमध्ये 21 कुत्रे-मांजरी यांची हत्या, विषबाधेतून हत्या)

मालूर परिसराचे अधिकारी धनलक्ष्मी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, हत्तीच्या कळपाला जंगलात पिटाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हे हत्ती वारंवार पुन्हा लोकवस्तीत येत आहेत. या हत्तींना जंगलात पुन्हा लवकरच परत पाठविण्यात येईल.