Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

सोशल मीडियात व्हिडिओ बनवून प्रसिद्ध होण्यासाठी विविध अॅप लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामधीलच एक टिकटॉक अॅप असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिकटॉकचे व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. या प्रकरणी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा प्रकार कर्नाटक येथील बेळगाव येथे घडला आहे.

अमन आवटे असे तरुणाचे नाव असून त्याने मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत टिकटॉकवर काही व्हिडिओ बनवून ते प्रसिद्ध केले होते. मात्र या व्हिडिओमुळे त्याला तुरुंगाची शिक्षा देण्यात आली असून राष्ट्रीय नेत्यांच्या विरोधात अपमानास्पद विधान केल्याच्या आरोपाखाली तक्रार करण्यात आली होती. या व्हिडिओच्या विरोधात हिंदूत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला होता. याबाबत नेटवर्क 18 लोकमत यांनी वृत्त दिले आहे. आवटे याने मोदी आणि अमित शहा यांचे व्हिडिओ तयार करुन त्याला स्पेशल इफेक्ट्स दिले होते. मात्र एखाद्या नेत्याबाबत असे व्हिडिओ बनवून व्हायरल करणे ही अपमानास्पद बाब असल्याची टीका केली जात आहे.

तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत सर्वांसमक्ष त्याचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल उर्फ हिरामणी तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो वडाळा येथील रहिवासी आहे. 19 डिसेंबर रोजी राहुलने मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर काल दुपारी शिवसैनिकांनी या व्यक्तीचे मुंडण केले