आर्थिक वर्ष 2020-21 पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तर येत्या 31 मार्च 2021 रोजी अर्थिक वर्ष संपणार आहे. अशातच तुम्ही तुमची काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहे. त्यामध्ये आर्थिक वर्षासंबंधित काही गोष्टी आहेत. विविध आर्थिक कामे जर तुम्ही अद्याप केली नसाल तर ती 31 मार्च पूर्वी पूर्ण करा. त्याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर तुम्हाला जुनी टॅक्स व्यवस्था निवडली असाल तर येत्या 31 मार्च पूर्वी टॅक्स सेविंग इंस्ट्रुमेंट मध्ये गुंतवणूक किंवा खर्च पूर्ण करणे आवश्यक असते. यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार डिक्लेरेशनच्या नुसार गुंतवणूक न केल्यास तुम्हाला त्यावेळी आर्थिक वर्षासाठी आयकर मध्ये घट करु शकत नाहीत.
जर तुम्ही आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआर भरला नसेल तर तो भरण्याचा कालावधी 31 मार्च आहे. त्यामुळे आयटीआर भरण्यास तुम्हाला उशिर झाल्यास 10 हजार रुपये शुल्क द्यावा लागणार आहे. मात्र जर तुमचा आयकर पाच लाखांपर्यंत असल्यास तुम्हाला फक्त 1 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.(Income Tax विभागाला आधार कार्डचा क्रमांक न दिल्यास भरावा लागेल 'इतका' दंड, जाणून घ्या सविस्तर)
त्याचसोबत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. गेल्या वेळी 30 जून 2020 ऐवजी 31 मार्च केली होती. त्यामुळे जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्डला लिंक केले नसेल तर तुमचा पॅन कार्ड क्रमांक निष्क्रिय होणार आहे. पॅन क्रमांक निष्क्रिय झाल्यानंतर पैशासंबंधित व्यवहार करण्यास अडथळा येऊ शकतो. (Maratha Reservation: सर्वोच्च न्यायलयाकडून महाराष्ट्रात मराठा समाजाला दिल्या जाणार्या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या याचिकांवरील निर्णय ठेवला राखून)
या व्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2021 पर्यंत व्याज मुक्त 10 हजार रुपयांपर्यंत विशेष अॅडवान्स मिळवू शकतात. सरकारने एलटीसी कॅश वाउचर स्किमसह ऑक्टोंबर 2020 मध्ये या योजनचे घोषणा केली होती. सरकारी कर्मचारी जर हा अॅडवान्स घेत असतील तर त्यांना अधिकाधिक 10 हफ्तांमध्ये ती परत करु शकतात.