Bees Attack at Wedding Ceremony: लग्नमंडपात मधमाशांचा हल्ला, 12 जण गंभीर जखमी; मध्य प्रदेशातील घटना
Bees Attack | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील गुना जिल्ह्यात एक विचित्र प्रसंग घडला ज्यामुळे लग्नात मोठी धावपळ उडाली. इतकी की काही काळ लग्नसोहळाही (Wedding Ceremony) विस्कळीत झाला. लग्नाच्या मांडवात विवाहासाठी पाहुणे मंडली उपस्थित होती. नवरा नवरी वरमाला घालण्याच्या क्षणाची वाट पाहात होती. सर्व काही विधीवत आणि शांततेत पार पडत होते. इतक्यात, मंडपात मोठी धावपळ उडाली. लोक सैरावैरा धावू लागले. विवाहातील उपस्थितांवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) चढवला. ज्यामुळे वऱ्हाडी सैरावरा धवू लागले. ही घटना कस्तुरी गार्डन हॉटेलमध्ये घडली.

काय घडले नेमके?

गुना जिल्ह्यातील कस्तुरी गार्डन हॉटेलमध्ये लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान, हॉटेलच्या छतावर असलेल्या मधमाशांच्या पोळे अचानक खाली पडले. त्यामुळे पोळ्यावर असलेल्या माशा चिडल्या आणि त्यांनी आलेल्या पाहुण्यांवर हल्ला केला. मधमाशा इतक्या आक्रमक होत्या की, उपस्थितांना बचावात्मक पवित्रा घेत अक्षरश: सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. या वेळी मंडवात मोठी धावपळ उडाली. वऱ्हाड्यांनी पूर्ण भरलेला मांडव पुढच्या काहीच क्षणात अक्षरश: रिकामा झाला. (हेही वाचा, काय सांगता? Vistara च्या विमानावर मधमाशांचा हल्ला; अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून हटवले (Watch Video))

जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार

घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल आणि स्थानिक आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पीडितांची मदत आणि बचाव केला. मधमाशांच्या डंखामुळे जखमी आणि वेदनाग्रस्त झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यातील काहींवर अतिदक्षा (ICU) विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हाटेल प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. हॉटेल प्रशासनाने आपला हॉल समारंभांना भाड्याने देण्यापूर्वी सुरक्षेची खात्री का केली नाही, असा प्रश्न उपस्तित होत आहे. मधमशांच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी आणि कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का याचा अधिकारी तपास करत आहेत. (हेही वाचा, राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, चार जण गंभीर जखमी)

दरम्यान, बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार आणि मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात अशाच घटना टाळण्यासाठी जागरुकता आणि सुरक्षा उपाय वाढविण्यासाठी स्थानिक अधिकारी देखील काम करत आहेत.मोठे मेळावे आणि उत्सवादरम्यान सुरक्षा मानकांवर अधिक भर देण्यातयावा यासाठी स्थानिक प्रशासनाने भर दिला आहे. तसेच मधमासांच्या हल्ल्यांसारख्या संभाव्य धोके आणि घटना कमी करण्यासाठी हॉटेल प्रशासनाने इमारत आणि आवारातील झाडांची तपासणी सुरु केली आहे. मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत. मधमाशांचे पोळे शक्यतो उंच झाड किंवा इमारतींवर असते. माशा शक्यतो शांत असतात पण जेव्हा त्यांना आपल्यावर हल्ला होतो असे वाटते तेव्हा त्या प्रतिहल्ला करण्यासाठी ढंख मारतात.