BECIL Recruitment 2019: 8 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, 3895 रिक्त पदांसाठी होणार भरती
Representational Image (Photo Credit: PTI)

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण ब्रॉडकास्ट इंजिनिअर कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांनी विद्युत निगम लिमिटेड (MVVNL)  मध्ये 3895 जागांवर नोकर भरती करणार आहेत. कंपनीकडून करण्यात येणार ही नोकर भरती दोन विभागात केली जाणार आहे. त्यानुसार स्किल्ड मॅनपावर आणि अन-स्किल्ड मॅनपावर अंतर्गत करण्यात येणार आहे.बीईसीआयएल यांच्या नोकर भरतीसाठी 8 वी पास असलेल्या उमेदवारांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारिख 18 नोव्हेंबर 2019 ला संपणार आहे. जर तुम्ही या नोकरीच्या संधीसाठी इच्छुक असल्यास खाली दिलेली अधिक माहिती येथे पहा.

>>एकूण पद

3895

>>योग्यता

अन-स्किल्ड मॅनपावरसाठी 8 वी पास असणारे अर्ज करु शकतात.

स्किल्ड मॅनपावरसाठी उमेदवारांना इलेक्ट्रिक किंवा वायरमॅनमध्ये आयटीआय असणे गरजेचे आहे.

>>अनुभव

स्किल्ड मॅन पावरसाठी उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल्स मध्ये कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर अन-स्किल्ड मॅनपावर उमेदवारांना इलेक्ट्रिकल सिस्टिमध्ये कमीत कमी एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

>>वयाची अट

40 वर्ष

>>अर्जाचे शुल्क

जनरल/ओबीसी- 500 रुपये

एससी/एनची- 250 रुपये

>>वेतन

स्किल्ड मॅनपावर- 9,381 रुपये

अन-स्किल्ड मॅनपावर- 250 रुपये

(रेल्वेमध्ये नोकरीची संधी, 10 वी मधील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार)

या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाईट www.beciljobs.com वर अधिक माहिती देण्यात येणार आहे. त्याचसोबत या वेबसाईटवरुन ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.