Bank Strike: आपण येत्या एक दोन दिवसांमध्ये काही बँकींगची कामे करण्याचे ठरवले असेल तर ती कामे आजच पूर्ण करा. अन्यथा उद्यापासून तीन दिवस ही कामे करण्यास आपल्याला अडचण येऊ शकते. वेतन बदल आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप (Bank Employee Strike) पुकारला आहे. त्यानुसार बँक कर्मचारी उद्या म्हणजेच 31 जानेवारी आणि 1 व 2 फेब्रुवारी असे तीन दिवस संपावर जात आहेत. सलग तिन दिवस बँका बंद (Online Banking Services) राहिल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या कालावधीत एटीएम (ATM) आणि ऑनलाईन बँकींग सुरु राहणार आहे. मात्र, ज्यांना प्रत्यक्ष बँक कार्यलायात जाऊन काम करायचे आहे, अशा मंडळींची गैरसोय होऊ शकते. ही गैरसोय टाळण्यासाठी बँकेशी संबंधीत कामे आजच केल्यास फायदा होऊ शकतो.
प्राप्त माहितीनुसार, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, इंडियन बँक, विजया बँक, जिल्हा सहकारी बँक यांसह इतर अशा मिळून 170 बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. संपादरम्यान, बँकांची बहुतांश कार्यालयं बद राहू शकतात. त्यामुळे अनेक ठिकाणी बँकांचे काम ठप्प होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे 300 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन फेब्रुवारी या दिवशी रविवार येतो आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. (हेही वाचा, शहरी सहकारी बँकांमध्ये 5 वर्षांमध्ये तब्बल 220 कोटी रुपयांचा घोटाळा: आरबीआय)
पीटीआय न्यूज
Bank unions call 2-day nationwide strike on January 31 & February 1 after talks over wage revision failed to make headway with the Indian Banks' Association
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2020
दरम्यान, संप काळात बँकांचे ऑनलाईन व्यवहार आणि एटीएम सुरु राहतील. तसेच, एटीएममध्ये पैसे टाकण्याची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आल्याचे प्रसारमध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. विविध शहरं आणि त्यांच्या हद्दीत सुमारे 65 हजार एटीएम आहेत. आणि जिल्ह्यांमध्ये सुमारे 260 एटीएम आहेत. त्यामुळे संप काळात ही एटीएमच ग्राहकांचा आधार ठरणार आहेत. दरम्यान, 31 जानेवारीला शुक्रवार तर 1 फेब्रुवारीला शनिवार आहे. तर 3 फेब्रुवारीला रविवार असल्याने बँकांचा सुट्टीचा दिवस आहे. सोमवारपासून म्हणजेच 4 फेब्रुवारी पासून बँका नियमित सुरु राहणार आहेत.