Bank of Baroda कडून स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या काय आहे ऑफर
Bank of Baroda | File Image

जर तुम्ही घर, दुकान किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 8 सप्टेंबर रोजी तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने मेगा ई-ऑक्शनचे (mega e-auction) आयोजन केले आहे. यात घरं, दुकानं आणि प्लॉट स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या संबंधिची माहिती खुद्द बँकेने ट्विट करत दिली आहे. या प्रक्रीयेत देशातील विविध शहरांमधील प्रक्रीयांचा समावेश आहे.

या ऑक्शनमध्ये बँकेकडून रहिवासी, व्यावसायिक, इंडस्ट्रीयल आणि शेतीसंबंधीत मालमत्तांचा लिलाव केला जाईल. अशावेळी तुम्ही नक्कीच यावर बोली लावू शकता. 8 सप्टेंबरपासून ही लिलाव प्रक्रीया दीर्घकाळ सुरु राहणार असल्याची माहिती बँकेने ट्विटद्वारे दिली आहे. तसंच कोणत्या शहरासाठी कधी लिलाव प्रक्रीया पार पडेल, याची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

Bank of Baroda Tweet:

(हे ही वाचा: गुजरातच्या वडोदरा येथील बँकेत पैशांना वाळवी लागण्याच्या प्रकारावर Bank of Baroda चं स्पष्टीकरण)

या लिलाव प्रक्रीयेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भाग घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अर्नेस्ट मनी डिपॉझिट आणि केवायसी संबंधित बँकेच्या नजीकच्या शाखेत जमा करावे लागतील. तसंच डिजिटल सिग्नेचरही आहे. डिपॉझिट जमा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला बँकेकडून लिलावात सहभागी होण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.