Bank Strike: 25 कोटी बँक कर्मचारी दोन दिवसीय देशव्यापी संपावर
Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Nation-wide Bank Strike : सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Employees) दोन दिवसीय संप पुकारला आहे. मंगळवार-बुधवार (8-9 जानेवारी) हे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघ सहभागी होणार आहेत. बँकांच्या एकूण 25 कोटी कामगारांनी एकजूट करुन दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे.

संपाचा निर्णय दिल्लीतील 10 प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि सर्व उद्योगांतील स्वतंत्र संघटनांच्या संयुक्त परिषदेत घेण्यात आला आहे.

संपामुळे सरकारी बँकांच्या व्यवहारास फटका बसणार असून नागरिकांचे देखील हाल होणार आहेत.

यापूर्वी 26 डिसेंबर, 2018 रोजी नऊ बँक संघटनांच्या सुमारे 10 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.