Mayawati | (Photo Credit - File Image)

बहुजन समाज पक्ष (Bahujan Samaj Party) आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा पक्षाच्या सुप्रिमो मायावती (Mayawati) यांनी केली आहे. त्या लखऊ येथे रविवारी (15 जानेवारी) बोलत होत्या. लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) मध्ये इतर कोणत्याही पक्षासोबत बसपाची (BSP) युती करण्यास मायावती (Mayawati On Assembly, Lok Sabha Polls) यांनी नकार दिला आहे.

दरम्यान, यंदा इशान्येकडील ज्यांव्यतिरिक्त कर्नाटक (Karnataka), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh ) आणि तेलंगणा (Telangana ) या प्रमुख राज्यांमध्येही विधानसभा निवडणूक पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी केलेले विधान अधिक महत्त्वपूर्ण आहे. (हेही वाचा, Mayawati On Gyanvapi Case: ज्ञानवापी वादावर मायावतींचे मोठे वक्तव्य - धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, सर्व धर्माच्या लोकांनी सतर्क राहावे)

मायावती आपल्या 67 व्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी संवाद साधत होत्या. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी हे स्पष्ट करू इच्छितो की कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि पुढील लोकसभा निवडणुकीत वर्षभरात बसपा कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. पक्ष बळावर निवडणूक लढवेल.

मायावती यांनी पुढे बोलताना सांगितले की, काँग्रेस आणि इतर काही पक्ष, "षड्यंत्र" म्हणून, ते बसपासोबत युती करणार असल्याचा आभास निर्माण करण्याचा कथित प्रयत्न करत. त्यामुळे ही घोषणा करणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये राज्य स्तरावर एक किंवा दोन वेळा केलेल्या निवडणूक युतीमध्ये, पंजाब वगळता, त्यांची मते (सहयोगी पक्ष) आमच्याकडे हस्तांतरित झालेली नाहीत, ज्यामुळे बसपचे नुकसान झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.