Proposed model of Ram temple (Photo Credits: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra)

देशभरातील रामभक्तांसाठी अयोध्येतून (Ayodhya) मोठी बातमी येत आहे. जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जानेवारी 2024 पासून राम मंदिर (Ram Temple Ayodhya) सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होणार आहे. मंगळवारी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली.

चंपत राय म्हणाले की, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले केल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसरातील लोकांच्या येण्या-जाण्यावर याचा काय परिणाम होतो, याचाही अभ्यास केला जात आहे. चंपत राय म्हणाले की, मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या बांधकामाचा वेग आणि दर्जा पाहून आम्ही समाधानी आहोत. मंदिराच्या उभारणीसाठी 1800 रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या भव्य मंदिराच्या उभारणीत लोखंडी सळ्यांचा वापर केला जात नाही. दगड जोडण्यासाठी लोखंडाऐवजी तांब्याच्या चिप्सचा वापर केला जात असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. या मंदिराला 392 खांब आणि 12 दरवाजे असतील. ते म्हणाले की, हे मंदिर भूकंप प्रतिरोधक आहे आणि सुमारे 1000 वर्षे याला काहीही होणार नाही. गर्भगृहात 160 खांब असतील. पहिल्या मजल्यावर 82 खांब असतील. मंदिराला 12 प्रवेशद्वार असतील.

रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे रामलल्लाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने गर्भगृहाची निर्मिती करण्यात येत असल्याचे या प्रकल्पाची देखरेख करणारे जगदीश आफळे यांनी सांगितले. चंपत राय यांनी सांगितले की, 2.7 एकरात पसरलेल्या या मंदिराच्या बांधकामात राजस्थानातून आणलेले ग्रेनाइट दगड वापरले गेले आहे. (हेही वाचा: Kedarnath Dham: मुंबईतील व्यावसायिकाने केदारनाथ धामला दान केले 230 किलो सोने; मंदिराच्या भिंती सुवर्णाने उजळल्या)

राम मंदिराशेजारी 25 हजार लोकांसाठी सुविधा केंद्र बांधले जाणार आहे. यासोबतच 50 एकर परिसरात छोटी मंदिरे असणार आहेत. त्रेतायुगाप्रमाणे मंदिराची सजावट करण्यात येणार आहे. मंदिरात बनवलेल्या कोरीव खांबांवर रामायणाशी संबंधित चित्रे लावण्यात येणार आहेत.