भंडाऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये नाना पटोले हे  (Nana Patole) थोडक्यात बचावले आहेत.  भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना (Accident News) घडली. काल रात्रीच्या सुमारास प्रचारांनतर सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. याच अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा - Loksabha Election 2024: शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी)

पाहा पोस्ट -

नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून रात्रीच्या वेळी परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यामुळे हा भीषण अपघात झाला.  नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे. नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे.

पाहा पोस्ट -

 

भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. उभ्या गाडीला ट्रकनं मागून दिली धडक दिली. नाना पाटोले तेव्हा मिटिंग घेत होते. सुदैवानं मोठी घटना टळली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.