Ather Energy IPO | (Photo credit: archived, edited, representative image)

स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी प्रसिद्ध असलेली अ‍ॅथर एनर्जी (Ather Energy) आता शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. Tiger Global सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून पाठिंबा मिळालेल्या या कंपनीचा आयपीओ (Ather Energy 2025) लवकरच खुला होणार आहे. भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात Ather एक मोठं नाव बनत आहे आणि आता ही कंपनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठीही खुली होत आहे. पाठिमागील आर्थिक वर्षातही अनेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात उतरवले आहेत. ज्यांना गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर अ‍ॅथर एनर्जी आयपीओस कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे. जाणून घ्या या आयपीओबद्दल अधिक तपशील.

इथे वाचा Ather Energy IPO बाबत 5 महत्त्वाच्या गोष्टी.

IPO केव्हा खुला होणार?

Ather Energy चा IPO 28 एप्रिल 2025 रोजी खुला होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप 25 एप्रिल रोजी करण्यात येईल. (हेही वाचा, SME IPOs Surge in 2024-25: लार्ज-कॅपच्या तुलनेत एसएमई आयपीओमध्ये वाढ; Stock Market लिस्टिंगमध्ये 7,111 कोटी रुपये उभारले)

IPO प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर:

  • 2 मे रोजी शेअर्सचे वाटप अंतिम केले जाईल
  • 5 मे पर्यंत परताव्याची प्रक्रिया पूर्ण होईल
  • 6 मे रोजी BSE आणि NSE वर शेअर्सची लिस्टिंग होईल
  • IPO मध्ये ₹2,626 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 1.1 कोटी शेअर्सचा Offer-for-Sale (OFS) समाविष्ट आहे.

शेअर किंमत आणि लॉट साईझ

  • Ather Energy ने ₹304 ते ₹321 प्रति शेअर किंमतीचा बँड निश्चित केला आहे. प्रत्येक शेअरचा फेस व्हॅल्यू ₹1 आहे.
  • गुंतवणूकदारांना किमान 46 शेअर्ससाठी बिड करावी लागेल, त्यानंतर फक्त त्याच प्रमाणात (मल्टिपल्स) बिड करता येईल.
  • Ather चे कर्मचारी असल्यास, त्यांना प्रत्येक शेअरवर ₹30 ची सूट मिळणार आहे.

शेअर्सचे वाटप कोणासाठी किती?

IPO तीन गटांमध्ये विभागला आहे:

  • 75% शेअर्स Qualified Institutional Buyers (QIBs) साठी राखीव
  • 15% शेअर्स Non-Institutional Investors (NIIs) साठी
  • 10% शेअर्स Retail Investors साठी

IPO मधील निधीचा वापर कुठे होणार?

कंपनी IPO मधून आलेल्या निधीचा उपयोग उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि नावीन्यपूर्णतेसाठी करणार आहे. खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे:

  • ₹927 कोटी महाराष्ट्रात नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादन युनिट उभारण्यासाठी
  • ₹750 कोटी संशोधन आणि विकासासाठी
  • ₹40 कोटी कर्ज फेडण्यासाठी
  • ₹300 कोटी आगामी तीन वर्षांत ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी वापरण्यात येणार

Ather Energy बद्दल थोडक्यात माहिती

Ather Energy ही बंगळुरूस्थित कंपनी असून इलेक्ट्रिक स्कूटर्स, विशेषतः Ather Rizta, साठी ओळखली जाते. डिसेंबर 2024 अखेर संपलेल्या 9 महिन्यांत कंपनीने आपला तोटा ₹776 कोटींवरून ₹578 कोटींवर आणला आहे. इतर ऑटो कंपन्यांच्या तुलनेत, Ather अनेक मुख्य घटक जसे की डॅशबोर्ड, चेसिस आणि मोटर कंट्रोलर स्वतः तयार करते. मात्र, काही भाग जसे की मोटर्स आणि चार्जर्स बाहेरून घेतले जातात. Ather ची लिस्टिंग झाल्यावर ती Hero MotoCorp, Bajaj Auto, TVS Motors, आणि Eicher Motors सारख्या दिग्गज कंपन्यांच्या रांगेत येईल.