Atal Pension Yojana: भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना अटल पेन्शन योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना आणण्यात आली आहे. अटल पेन्शन योजना म्हणजेच API ने 9 वर्षे पूर्ण केली आहेत. योजनेच्या दहाव्या वर्षात, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) मंगळवारी एकूण नोंदणीच्या आकडेवारीची माहिती दिली. PFRDA ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 कोटी लोक अटल पेन्शन योजनेत सामील झाले आहेत. योजनेअंतर्गत, 2024-25 मध्ये आतापर्यंत 56 लाखांहून अधिक नावनोंदणी करण्यात आली आहे. "योजना दहाव्या वर्षात आहे आणि एक मोठा टप्पा गाठला आहे," असे प्राधिकरणाने सांगितले.
निवृत्तीवेतनाची रक्कम लाभार्थी योजनेतील त्याच्या योगदानाच्या आधारावर ठरवते. भारतातील कोणताही नागरिक या योजनेत नावनोंदणी करू शकतो. योजनेसाठी, व्यक्तीचे पोस्ट ऑफिस किंवा बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे.
प्राधिकरणाने सांगितले की, "समाजातील दुर्बल घटकांना पेन्शनच्या कक्षेत आणण्याचे हे यश सर्व बँका आणि SLBCs/UTLBCs यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे."