Atal Bihari Vajpayee Jayanti 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा सह दिग्गजांंनी वाहिली अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली!
Atal Bihari Vajpayee Birth Anniversary | Photo Credits: Twitter/ ANI

Atal Bihari Vajpayee 95th Jayanti:  भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज (25 डिसेंबर) 95 वी जयंती आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा 'सुशासन दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून आज त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान ट्वीटरच्या माध्यमातूनही त्यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे. Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: सुशासन दिवस निमित्त जाणून घ्या दिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास.

नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्मृतीला वंदन करताना त्यांच्या जयंती दिवशी कोटी कोटी प्रणाम अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. तर अमित शहा यांनी त्यांची विचारधारा, राष्ट्रहितासाठी समर्पित केललं जीवन आणि भारतीय राजकारणातील त्यांची छाप सोबतच त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला आपली आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट

अमित शहा यांचे ट्वीट

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट 

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला. वाजपेयी हे भाजप पक्षाचे संस्थापक सदस्य असून ते पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. भाजप पक्षाने 1996 मध्ये पहिल्यांदा मित्र पक्षाच्या पाठिंब्याने केंद्रात सत्ता मिळवली. वाजपेयी हे भारताचे दहावे पंतप्रधान होते. वाजपेयी हे उत्तम राजकारणी तसेच हिंदी कवीही होते. वाजपेयी हे 1991 ते 2009 दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ 13 दिवस टिकलेल्या 11 व्या लोकसभेत तसेच 12 व्या लोकसभेत पंतप्रधान होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली अटलबिहारी बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलाम म्हणून तेव्हापासून त्यांच्या जन्मदिवस हा सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.