Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ सह 5 राज्यांत आज विधानसभा निवडणूकीचं मतदान; दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
Assembly Elections 2021| Photo Credits: ANI

भारतामध्ये एकीकडे कोरोना वायरस पुन्हा हातपाय पसरत असताना आज देशात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. कोविडच्या काळातही मतदान केंद्रांवर पुरेशी काळजी घेत मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. आज (6 एप्रिल) पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पॉन्डिचेरी, तामिळनाडू येथे मतदान आहे. आज पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदान आहे तर तामिळनाडू, केरळ, पॉन्डिचेरीतही मतदानाला सकाळपासून सुरूवात झाली आहे. बंगाल, आसाम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे भाजपाच्या प्रचारात सहभागी होत आहेत. तर काल टीएमसीच्या उमेदवारांसाठी अभिनेत्री, खासदार जया बच्चन देखील मैदानात उतरल्या होत्या. (नक्की वाचा: West Bengal Assembly Elections 2021: भाजपविरुद्ध लढण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाले Jaya Bachchan यांचे समर्थन).

आज सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली असल्याने त्यामध्ये रजनीकांत, कमल हसन, केरळात भाजपाच्या तिकीटावर निवडणूकीच्या मैदानात उतरलेले मेट्रो मॅन श्रीधरन यांनी मतदान केले आहे. दरम्यान आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत मतदानासाठी मतदारांनी प्रामुख्याने तरूण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावं असे आवाहन केले आहे.

कमल हसन कुटुंबासह मतदानासाठी रांगेत

रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क

पश्चिम बंगालमध्ये आज 31 विधानसभा मतदारसंघांसाठी,आसाममध्ये तिसऱ्या टप्प्यात 40 जागांसाठी, केरळमध्ये विधानसभेच्या 140 जागांसाठी, तामिळनाडूतील 234 जागांसाठी, पुदुच्चेरीत विधानसभेच्या 30 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.