Assembly Election 2021: पश्चिम बंगाल, तमिळनाडू, असम, केरळ, पुदुच्चेरी राज्यात विधानसभा निवडणूक; निवडणूक आयोग आज घोषणा करण्याची शक्यता
Gram Panchayat Elections | (File Image)

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, असम, केरळ, पुदुच्चेरी या राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2021) लागणार आहे. या निवडूकींच्या तारखा आणि एकूण कार्यक्रम याबाबत मुख्य निवडणूक आयोग आज (शुक्रवार, 26 फेब्रुवारी) सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत या निवडणुक कार्यक्रमांची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहिती अशी की आज सायंकाळी 4.30 वाजता निवडणूक आयोग ही पत्रकार परिषद घेणार आहे. दरम्यान, नवी दिल्ली येथील अशोका रोड येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात एक बैठक सुरु असल्याची माहिती आहे.

कोणकोणत्या राज्यात निवडणुका?

पश्चिम बंगाल, असम, तमिलनाडु, केंद्र शासित पुडुचेरी आणि केरळ

पश्चिम बंगाल राज्यात एकूम 294 विधानसभा जागा आहेत. सध्या या राज्यात तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. विद्यमान विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 211 जागा मिळाल्या आहेत. तर विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षाला 44, डव्यांना 26, भाजपला 3 जागा प्राप्त आहेत.

असम राज्यात विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. या राज्यात सध्या एनडीए सरकार सत्तेवर असून सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री आहेत. या आधीच्या निवडणुकीत भाजपने 89 जागांवर निवडणूक लढली होती. त्यापैकी 60 जगांवर विजय मिळवला होता. तर असम गण परिषदेने 30 जागा लढवून 14 जागांवर विजय मिळवला होता. बोडोलँड पिपल्स फ्रंटने 13 जागा लढवत 12 जगांवर विजय मिळवला. या राज्यात काँग्रेसने 122 जागा लढवल्या आणि केवळ 26 जागांवर विजय मिळवला. या राज्यात बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता असते.

तामिळनाडू राज्यात विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. या ठिकाणी सध्या ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कषगम (AIADMK) पक्षाचे सरकार आहे. या पक्षाचे ई पलानीस्वामी हे मुख्यमंत्री आहेत. या आधिच्या निवडणुकीत AIADMK ने 136 आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डीएमके ने 89 जागांवर विजय मिळवला आहे. बहुमतासाठी या राज्यात 118 जागा आवश्यक असतात.

पुडुचेरी हे एक केंद्रशासित राज्य आहे. या राज्यात विधानसभेच्या 30 जागा आहेत. सध्यास्थितीत या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-डीएमके आघाडीचे सरकार येथे कोसळले. त्यामुळे या राज्या राष्ट्रपती राजवट लागू झाली. या आधिच्या निवडणुकीत काँग्रेसने 21 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 15 जागांवर विजय मिळवला होता. या राज्यात बहुमतासाठी 16 जागा आवश्यक असतात.

कोरळ राज्यात विधानसभेच्या 140 जागा आहेत. सध्या या राज्यात सीपीआई (एम) पक्षाची सत्ता आहे. या ठिकाणी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) सरकार आहे आणि पिनराई विजयन हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पाठिमागील निवडमूक एलडीएफने 91 आणि काँग्रेसने यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) च्या माध्यमातून 47 जागा जिंकल्या होत्या. या राज्यात बहुमतासाठी 71 जागा आवश्यक असतात.